ब्रँड संसाधने

आमच्‍या ब्रँडची मूलभूत तत्त्वे खाली देण्यात आली आहेत. हे पेज तुम्‍हाला सुरुवात करून देण्यात मदत करत असले तरी सर्व वापरांना YouTubeची मंजुरी मिळणे गरजेचे आहे.

ब्रँड वापर विनंती फॉर्म भरा

YouTube लोगो वापरणे

जागा मोकळी करा

मोकळी जागा लोगोला इमेज, मजकूर किंवा इतर ग्राफिकमधून बफर करते जी त्याच्या प्रभाव आणि दृश्यमानतेशी तडजोड करते. तुम्ही आमच्या लोगोला जितकी जास्त जागा द्याल, तितका तो जास्त प्रभावी होईल.

लोगोच्या सभोवतालच्या मोकळ्या जागेचे प्रमाण आयकनच्या उंचीशी समान किंवा जास्त असले पाहिजे.

YouTube लोगो, पूर्ण रंगीत, सौम्य बॅकग्राउंडवर

आकार

आम्ही विशिष्ट आकारांसाठी आमचा लोगो ऑप्टिमाइझ केला आहे. आमचा लोगो स्मार्टफोनवर दिसत असो अथवा नाट्यगृहातील मोठ्या स्क्रीनवर, तो सुस्पष्ट आणि सुवाच्य असणे आवश्यक आहे.

YouTube लोगो, पूर्ण रंगीत, सौम्य बॅकग्राउंडवर

किमान डिजिटल उंची: २०dp

YouTube लोगो, पूर्ण रंगीत, सौम्य बॅकग्राउंडवर

किमान प्रिंट उंची: 0.125इं किंवा 3.1मिमी

लोगोसोबत काय करू नये

YouTube लोगो हा लोकांच्या माहितीतील एक प्रतीक आहे, म्हणून तो कधीही बदलू नये.

YouTube लोगोसोबत काय करू नये याची काही उदाहरणे येथे आहेत.

करू नकाकरू नका

  • आयकन आणि "YouTube" शब्दामधील किंवा त्याच्या वर्णांमधील अंतर बदला
  • लाल व्‍यतिरिक्‍त कोणतेही, काळपट किंवा पांढरट रंग वापरा
  • "YouTube" साठी दुसरा टाइपफेस वापरू नका
  • ड्रॉप शॅडोसारखे व्हिज्युअल इफेक्ट जोडू नका
  • "YouTube" शब्द कोणत्याही प्रकारे बदलू नका किंवा त्याऐवजी दुसरा शब्द घालू नका
  • लोगोचा आकार बदलू नका
  • एखाद्या वाक्प्रचारात किंवा वाक्यात लोगो वापरा
YouTube लोगोचा प्रत्‍यक्ष वापर करताना झालेल्‍या सामान्‍य चुका

भरीव बॅकग्राउंडवर लोगो वापरणे

या उदाहरणांमधून विविध भरीव बॅकग्राउंडवर YouTube लोगोचा योग्य वापर कसा करता येईल हे कळते. 40% पेक्षा सौम्य राखाडी बॅकग्राउंडवर काळपट पूर्ण रंगीत लोगो वापरणे आवश्‍यक आहे. 50% पेक्षा गडद राखाडी बॅकग्राउंडवर पांढरा पूर्ण रंगीत लोगो वापरणे आवश्‍यक आहे.

भरीव बॅकग्राउंडवरील YouTube लोगो

पूर्ण रंगीत लोगो

पूर्ण रंगीत लोगोच्‍या दोन आवृत्त्या आहेत, काळपट आणि पांढरट - परंतु आयकनमधील त्रिकोण नेहमी पांढरा असणे आवश्‍यक आहे.

सौम्‍य बॅकग्राउंडवर काळपट पूर्ण रंगीत लोगो वापरा. गडद बॅकग्राउंडवर पांढरा पूर्ण रंगीत लोगो वापरा.

पूर्ण रंगीत बॅकग्राउंडवर पूर्ण रंगीत YouTube लोगो

मोनोक्रोम लोगो

जर बॅकग्राउंड रंगामुळे पूर्ण रंगीत लोगो पाहणे कठीण होत असल्यास, तुम्ही त्याऐवजी मोनोक्रोम लोगो वापरणे.आवश्‍यक आहे.

काळपट (# 282828) मोनोक्रोम लोगोमधील आयकनमध्ये एक पांढरा त्रिकोण असतो. हा सौम्य बहुरंगी इमेजवर वापरणे आवश्‍यक आहे.

पांढर्‍या (#FFFFFF) मोनोक्रोम लोगोमध्ये कोणताही रंग नसलेला त्रिकोण असतो. हा गडद बहुरंगी इमेजवर वापरणे आवश्‍यक आहे.

राखाडी ग्रेडियंट बॅकग्राउंडवर YouTube लोगो

YouTube आयकन वापरणे

आमचे आयकन

आमचे आयकन एक लवचिक मार्क आहे जे कॉल टू अॅक्शन आणि आमच्या लोगोची एक छोटी आवृत्ती म्हणून कार्य करते. तुमच्‍याजवळ 24डीपीचचा लोगो वापरण्‍यासाठी योग्‍य प्रमाणात पुरेशी सुरक्षित जागा नसल्‍यास, तुम्‍ही त्‍याऐवजी YouTube आयकन वापरणे आवश्‍यक आहे.

YouTube आयकन, पूर्ण रंगीत

जागा मोकळी करा

मोकळी जागा लोगो आयकनला इमेज, मजकूर किंवा इतर ग्राफिकमधून बफर करते जी त्याच्या प्रभाव आणि दृश्यमानतेशी तडजोड करते. तुम्ही आमच्या लोगो आयकनला जितकी जास्त जागा द्याल, तितका तो जास्त प्रभावी होईल.

सभोवतालच्या मोकळ्या जागेचे प्रमाण लोगो आयकनच्या उंचीशी समान किंवा जास्त असले पाहिजे.

YouTube लोगो, सौम्‍य, गडद बॅकग्राउंडवर पांढरा

आकार

आम्ही विशिष्ट आकारांसाठी आमचा लोगो आयकन ऑप्टिमाइझ केला आहे. आमचा लोगो स्मार्टफोनवर दिसत असो अथवा नाट्यगृहातील मोठ्या स्क्रीनवर, तो सुस्पष्ट आणि सुवाच्य असणे आवश्यक आहे.

YouTube आयकन, पूर्ण रंगीत, सौम्य बॅकग्राउंडवर

किमान डिजिटल उंची: २०dp

YouTube आयकन, पूर्ण रंगीत, सौम्य बॅकग्राउंडवर

किमान प्रिंट उंची: 0.125इं किंवा 3.1मिमी

आयकनसोबत काय करू नये

YouTube आयकनमध्ये कधीही बदल करू नये.

आयकनसोबत काय करू नये याची काही उदाहरणे येथे आहेत.

करू नकाकरू नका

  • आयकनचा आकार आडवा किंवा उभा ताणू नका
  • त्रिकोणाचे कोन किंवा त्‍याचा आकार बदलू नका
  • लाल व्‍यतिरिक्‍त, काळपट किंवा पांढरट रंग वापरा
  • आयकन फिरवू नका
  • कोणतेही विशेष इफेक्ट जोडू नका
  • आयकनला एक पॅटर्न किंवा इमेज जोडू नका
  • त्रिकोण इतर आकार किंवा आयकनसोबत बदलू नका
  • त्रिकोणाला शब्दांसोबत बदलू नका
  • आयतासाठी नवीन आकार निवडू नका
YouTube आयकनचा प्रत्‍यक्ष वापर करताना झालेल्‍या सामान्‍य चुका

सामाजिक मीडियामध्‍ये आयकन वापरणे

YouTube आयकन एका YouTube चॅनेलशी लिंक केलेले असतानाच फक्त सामाजिक मीडिया मालमत्तेमध्ये वापरले जाऊ शकते.

महत्त्वाचे: डेस्टिनेशन URL YouTube चॅनेल असल्‍यावरच लोगो किंवा आयकनला लिंक बनवता येऊ शकते.

सामाजिक मीडिया शेअर बार संदर्भामध्‍ये YouTube आयकन

संदर्भात YouTube सामाजिक मीडिया आयकन

YouTube रंग

YouTube ब्रँड घटकांच्या कोणत्‍याही वापरास खास मंजुरी आवश्‍यक असते आणि मंजुरीची विनंती पुनरावलोकनासाठी असलेल्या ब्रॅंड वापर विनंती फॉर्मच्या माध्यामातून इंग्रजीमध्ये सबमिट करणे आवश्यक असते. इंग्रजीत नसलेल्‍या विनंत्यांसाठी, कृपया YouTube पार्टनरशिप काउंटरपार्टशी संपर्क साधा. ट्रेडमार्कच्या कोणत्‍याही प्रकारच्‍या अयोग्‍य वापरावर आक्षेप घेण्‍याचे आणि अधिकाराअंतर्गत कारवाई करण्‍याचे हक्क YouTubeकडे आरक्षित आहेत.

ब्रँड वापर विनंती फॉर्म भरा

साथीदार आणि जाहिरातदार

तुम्‍हाला तुमच्या YouTube चॅनेलचा किंवा आशयाचा प्रचार करायचा अाहे आणि आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. तुम्‍ही YouTube नाव, लोगो आणि आयकन वापरू शकता, फक्त तुम्ही लोगो आणि आयकन वापराच्‍या मार्गदर्शकतत्‍त्‍वांचे तसेच खालील गोष्‍टींचे पालन करत आहात याची खात्री करून घ्या.

करा

  • YouTubeने मंजूर केलेल्‍या कोणत्‍याही YouTube ब्रँड घटकाचा प्रत्‍येक वापर जाणून घ्या
  • YouTube ब्रॅंडच्या सर्व मार्गदर्शकतत्‍त्‍वांचे अनुसरण करा
  • चॅनेल आर्टमध्‍ये वारंवार YouTube लोगो वापरणे टाळा
  • वापरात असलेले लोगो अप टू डेट असल्‍याची खात्री करा
  • सामाजिक आयकन लाइनअपच्‍या आत YouTube आयकन वापरा
  • तुमच्‍या चॅनेलवर ट्रॅफिक लिंक किंवा ड्राइव्‍ह करताना तुमच्‍या चॅनेल किंवा आशयाचा प्रचार करण्याताठी सर्वसाधारण लोगो वापरा

करू नका

  • YouTube च्‍या बाहेरील साइटवर ड्राइव्‍ह करण्‍यासाठी लोगो किंवा ब्रँड घटक वापरा
  • लोगो, आयकन किंवा इतर ब्रँड घटक कशाही पद्धतीने बदला, त्यामध्ये आकार, स्थान, ताण, संघनन, रंग बदल किंवा टाइपफेस, फ्लिपिंग किंवा फिरवणे किंवा इफेक्ट देणे यांखेरीज इतर अनेक पद्धतींचा समावेश असेल.
  • पूर्ण रंगीत लोगो लालमध्‍ये (व्‍यवस्थित दिसत नसल्‍याने) ठेवू नका
  • लोगो किंवा आयकन अंशत: कव्‍हर करा
  • लोगो किंवा आयकनमध्ये इमेज ठेवू नका

YouTube ब्रँडिंग वापरण्याची काही चांगली आणि वाईट उदाहरणे येथे आहेत:

इतर सामाजिक मीडिया आयकनसह YouTube इनलाइन वापरताना, YouTube लोगो वापरण्‍यापेक्षा YouTube आयकन वापरणे उत्तम ठरेल.

करा
करू नका

YouTube लोगो आणि आयकन ठीक करा

तुम्‍ही योग्‍य, अपडेट केलेला YouTube लोगो वापरत असल्‍याची आणि अनधिकृत किंवा जुना लोगो वापरत नसल्‍याची (तसे बरेच आहेत) खात्री करण्‍यासाठी कृपया दोनदा तपासा. नवीनतम लोगो डाउनलोड केले जाऊ शकतात.

करा
करू नका

सर्वसाधारण लोगो व्‍यवस्थित दिसत नसल्‍याने लाल बॅकग्राउंडवर ठेऊ नये. लालवर पांढरा मोनोक्रोम लोगो उठून दिसतो.

करा
करू नका

चॅनेल आर्टवर पूर्ण रंगीत लोगो वापरू नये कारण तो वेबसाइटवर असलेल्‍या YouTube लोगोसोबत वापरणे अनावश्‍यक आहे.

करा
करू नका

तृतीय पक्ष मंजुरी

  • तुमच्‍या मालकीची नाही असा कोणताही आशय YouTubeवर अपलोड करण्याआधी संबंधित आशय मालकांकडून तृतीय पक्ष मंजुरी मिळवणे ही तुमची जबाबदारी आहे.
  • तुम्‍ही प्रचारात्‍मक मटेरियलमध्‍ये कोणताही आशय दाखवल्‍यास त्यासाठी संबंधित आशय मालकांकडून तुमच्‍याजवळ योग्‍य तृतीय-पक्षीय मंजुरी मिळवणे आवश्‍यक आहे.
  • YouTube आमच्‍या साथीदारांच्‍या वतीने परवानग्‍यांसाठी बोलणी करत नाही. आवश्यक त्या परवानग्‍या मिळवण्‍यासाठी इमेज किंवा व्हिडिओ मालकाशी थेट संपर्क साधावा.
  • YouTubeवर अपलोड करून तुम्ही तुमच्याकडे व्हिडिओ अपलोड करण्‍याचे आवश्‍यक हक्‍क असल्‍याची हमी देता. वापर अटी किंवा सामुदायिक मार्गदर्शक तत्‍त्‍वे यांचे उल्‍लंघन करणारा कोणताही आशय साइटवरून काढून टाकण्‍याचे हक्‍क YouTubeकडे आरक्षित आहेत.

"YouTube वापरकर्ता" शब्‍द वापरणे

निर्माणकर्त्‍यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे

  • आम्‍हाला आनंद होत आहे की, बर्‍याच निर्माणकर्त्‍यांना स्‍वत:ला YouTuber वापरकर्ते म्‍हणवून घ्‍यायला आवडत आहे. पण, फक्त YouTube वर मूळ व्हिडिओ किंवा म्‍युझिक आशय तयार आणि अपलोड करणार्‍या व्‍यक्‍तीबद्दल बोलले जात असेल तेव्हाच “YouTube वापरकर्ता” किंवा “Tuber” वापरले जावे असे आमचे म्हणणे आहे.
  • आम्‍हाला "YouTube वापरकर्ता" हे नाव साधे, प्रासंगिक निमित्ताने वापरले जाऊ शकेल असे ठेवायचे आहे. अशाने प्रत्‍येकजण ते नाव वापरू शकेल. म्‍हणूनच, व्हिडिओ सिरीझ, पुस्‍तके आणि कार्यक्रम किंवा रजिस्‍टर डोमेन, चॅनेल नावे किंवा ट्रेडमार्क ज्‍यामध्‍ये शब्‍दांचा समावेश असतो अशा गोष्‍टींच्‍या अधिकृत नावांमध्‍ये “YouTuber” किंवा “Tuber” वापरू नका. अशाने आम्‍हाला संपूर्ण निर्माणकर्ता समुदायासाठी YouTube ट्रेडमार्क संरक्षित ठेवण्‍यात मदत होईल.

जाहिरातदारांसाठी मार्गदर्शक तत्‍त्‍वे

  • YouTube वर मूळ व्हिडिओ किंवा म्‍युझिक आशय तयार आणि अपलोड करणार्‍या व्‍यक्‍तीबद्दल बोलले जात असेल तेव्हाच “YouTube वापरकर्ता” वापरले जावे. नुसतेच इतर व्हिडिओ प्‍लॅटफॉर्मवर आशय अपलोड करणार्‍या लोकांना "YouTubers” संबोधणे योग्य ठरणार नाही.
  • त्यामुळे आम्‍ही खात्री देऊ शकतो की, "YouTube वापरकर्ता" हे नाव फक्त सहज, प्रासंगिक निमित्ताने वापरले जाऊ शकते. व्हिडिओ सिरीझ, पुस्‍तके आणि कार्यक्रम अशा गोष्टींच्या अधिकृत नावांमध्‍ये किंवा डोमेन, चॅनेल नावे किंवा ट्रेडमार्कच्या नोंदणीमध्ये “YouTube वापरकर्ता” हे नाव वापरू नये असे आमचे तृतीय पक्षास सांगणे आहे. अशाने आम्‍हाला आमच्यासाठी आणि समुदायासाठी YouTube ट्रेडमार्कला सुरक्षित ठेवण्‍यात मदत होईल.
  • YouTube निर्माणकर्ते अनौपचारिकरीत्‍या “Tuber” वापरत असले तरी ते जाहिरातदारांनी वापरता कामा नये.

YouTube ब्रँड घटकांच्या कोणत्‍याही वापरास खास मंजुरी आवश्‍यक असते आणि मंजुरीची विनंती पुनरावलोकनासाठी असलेल्या ब्रॅंड वापर विनंती फॉर्मच्या माध्यामातून इंग्रजीमध्ये सबमिट करणे आवश्यक असते. इंग्रजीत नसलेल्‍या विनंत्यांसाठी, कृपया YouTube पार्टनरशिप काउंटरपार्टशी संपर्क साधा. ट्रेडमार्कच्या कोणत्‍याही प्रकारच्‍या अयोग्‍य वापरावर आक्षेप घेण्‍याचे आणि अधिकाराअंतर्गत कारवाई करण्‍याचे हक्क YouTubeकडे आरक्षित आहेत.

ब्रँड वापर विनंती फॉर्म भरा

करमणूक आणि मीडिया

कोणत्‍याही मी‍डियामध्‍ये YouTube ब्रँड दाखवण्‍यासाठी (व्‍हिडिओ, टीव्ही शो, चित्रपट, वृत्तपत्रे, इ.) कृपया ही मार्गदर्शक तत्त्‍वे वाचा.

ब्रँड वापर मंजुरी

तुम्‍ही करमणूक आणि मीडिया इंडस्‍ट्रीमध्‍ये असल्‍यास, कोणत्‍याही मीडियामध्‍ये (उदा. टीव्‍ही, संगीत व्हिडिओ, चित्रपट, पुस्‍तके, इ.) YouTube लोगो, आयकन किंवा UI चे घटक (उदा. बटणे, पेज, मोबाइल स्क्रीनशॉट, इ.) दाखवण्यार्‍या सर्व उत्‍पादन स्थानांना YouTube ची मंजुरी मिळणे आवश्‍यक आहे. कृपया लोगो वापर मार्गदर्शक तत्वे तसेच खाली दिलेल्‍या गोष्‍टींचे पालन करा, नंतर इंग्रजीमध्‍ये ब्रँड वापर विनंती फॉर्म भरून तुमची विनंती सबमिट करा. उत्‍पादन प्‍लेसमेंट मोठ्या प्रमाणावर पाहिले गेल्यास, तुम्‍ही Google Inc. रीलीझ फॉर्मवर स्‍वाक्षरी करण्याची गरज भासू शकते.

महत्‍त्‍वाचे: तुम्‍ही प्रेसचा भाग असल्‍यास, तुम्‍हाला ब्रँड वापर विनंती फॉर्म भरून विनंती सबमिट करण्‍याची गरज नाही. कृपया वाचा. त्‍यानंतर तुम्‍ही YouTube लोगो किंवा आयकन वापरण्यासाठी ते डाउनलोड करू शकता.

Google परवानग्या फॉर्म भरा

तुमची उत्‍पादन प्‍लेसमेंट विनंती सबमिट करण्‍यापूर्वी, कृपया खालील गोष्‍टींची खात्री करा

  1. उत्‍पादन प्‍लेसमेंटमधून YouTubeचे सकारात्‍मक किंवा तटस्‍थ पद्धतीचे प्रतिबिंब दिसते.
  2. खासकरून उत्‍पादन प्‍लेसमेंटसाठी विकसित केलेला कोणताही व्हिडिओ आशय YouTubeच्‍या· सामुदायिक मार्गदर्शक तत्‍त्‍वांचे उल्‍लंघन करत नाही आणि YouTubeच्‍या· वापर अटींचे उल्‍लंघन करणार नाही.
  3. तुम्‍ही तुमच्या विनंतीसोबत प्‍लेसमेंटसाठी पुष्‍कळ संदर्भ सबमिट करू शकता. तुम्‍ही YouTube लोगो आणि/किंवा YouTube इंटरफेसचे योग्य संदर्भातील मॉक, तसेच संबंधित स्क्रिप्‍ट पेज, निर्माणाचा आढावा, निर्माता कंपनीचे नाव आणि कलाकार, दिग्‍दर्शक, इ. तपशील असलेली एक PDF फाइल सबमिट करणे आवश्‍यक आहे. यामुळे तुमच्या निर्माणात YouTube चे सादरीकरण कसे असेल हे आम्हाला समजण्‍यात मदत होईल.

तृतीय पक्ष मंजुरी

  • साइटवरील तृतीय पक्ष अाशयाची मालकी YouTube कडे नाही. तुमच्‍या उत्पादन प्लेसमेंटमध्‍ये एखाद्या वापरकर्त्याचा किंवा भागीदाराचा अाशय दिसत असेल तर अाशय मालकाकडून त्या आशयाच्या वापराची परवानगी घेण्याची जबाबदारी तुमची असेल.
  • YouTube आमच्‍या साथीदारांच्‍या वतीने परवानग्‍यांसाठी बोलणी करत नाही. आवश्यक त्या परवानग्‍या मिळवण्‍यासाठी इमेज किंवा व्हिडिओ मालकाशी थेट संपर्क साधावा.
  • YouTubeवर अपलोड करून तुम्ही तुमच्याकडे व्हिडिओ अपलोड करण्‍याचे आवश्‍यक हक्‍क असल्‍याची हमी देता. वापर अटी किंवा सामुदायिक मार्गदर्शक तत्‍त्‍वे यांचे उल्‍लंघन करणारा कोणताही आशय साइटवरून काढून टाकण्‍याचे हक्‍क YouTubeकडे आरक्षित आहेत.
  • तुमच्‍याजवळ तुमची सर्व माहिती आणि मटेरिअल येताच, ब्रँड वापर विनंती फॉर्मने पुनरावलोकनासाठी इंग्रजीमध्‍ये ब्रँड वापर विनंती सबमिट करा. उत्तर देण्यासाठी अाम्हाला कृपया एक आठवड्याचा वेळ द्या. इंग्रजीत नसलेल्‍या विनंत्यांसाठी, कृपया YouTube पार्टनरशिप काउंटरपार्टशी संपर्क साधा. कोणत्‍याही प्रकारच्‍या अयोग्‍य ट्रेडमार्क वापरावर आक्षेप घेण्‍याचे आणि अधिकाराअंतर्गत कारवाई करण्‍याचे हक्क YouTubeकडे आरक्षित आहेत.

YouTube ब्रँड घटकांच्या कोणत्‍याही वापरास खास मंजुरी आवश्‍यक असते आणि मंजुरीची विनंती पुनरावलोकनासाठी असलेल्या ब्रॅंड वापर विनंती फॉर्मच्या माध्यामातून इंग्रजीमध्ये सबमिट करणे आवश्यक असते. इंग्रजीत नसलेल्‍या विनंत्यांसाठी, कृपया YouTube पार्टनरशिप काउंटरपार्टशी संपर्क साधा. ट्रेडमार्कच्या कोणत्‍याही प्रकारच्‍या अयोग्‍य वापरावर आक्षेप घेण्‍याचे आणि अधिकाराअंतर्गत कारवाई करण्‍याचे हक्क YouTubeकडे आरक्षित आहेत.

Google परवानग्या फॉर्म भरा

API विकासक

YouTube API मुळे तुम्‍हाला तुमच्या अॅप्लिकेशन किंवा डिव्‍हाइसमध्‍ये YouTube कार्यक्षमता समाविष्‍ट करता येतात. मार्गदर्शकतत्‍त्‍वे समजून घेण्‍यासाठी आणि तुम्हाला तुमच्या अॅप्लिकेशन, डिव्हाइस किंवा मार्केटिंग मटेरियलमध्‍ये YouTube ब्रँडिंग जोडायचे आहेत असे अॅसेट डाउनलोड करण्यासाठी खालील साइटला भेट द्या.

YouTube API विकासकांच्या ब्रँडिंग मार्गदर्शक तत्त्वांना भेट द्या

डिव्हाइस साथीदार

YouTube ब्रँडच्या वापरास मंजूरी मिळवण्यासाठी, कृपया ब्रँड वापर विनंती फॉर्मने इंग्रजीमधील विनंती पुनरावलोकनासाठी सबमिट करा. कृपया उत्तर देण्यासाठी एका आठवड्याचा वेळ द्या. YouTube त्यांच्या ट्रेडमार्कच्या कोणत्याही प्रकारच्या अयोग्य वापरावर आक्षेप घेण्याचा आणि कोणत्याही वेळी त्यांच्या अधिकारांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार राखून ठेवते. तुमच्या डिव्हाइसवर YouTube आणि YouTube ब्रँडच्या वापरासाठी YouTube सोबत एक स्वतंत्र लिखित करारनामा करणे आवश्यक आहे. हे करारानुसार तुमच्या डिव्हाइसने YouTube च्या सर्टिफिकेशन आवश्यकता पास करण्याच्या अधीन असते.

ब्रँड वापर विनंती फॉर्म भरा